जामखेडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी: आंदोलनाचा आज तिसरा दिवस : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ – माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराटजामखेडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी: आंदोलनाचा आज तिसरा दिवस : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ – माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट

शासनाच्या धोरणांमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी केला. तीस वर्षे सेवा करूनही पेन्शन मिळत नसल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.

मंगळवार, २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपात सुमारे १७ लाख कर्मचारी सहभागी झाले असून जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर, आरोग्य व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. संपामुळे शाळा, तहसील कार्यालय, कृषी व आरोग्य विभागाची कामकाजे गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाली आहेत.

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

साकत येथे कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न:ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत) यांचे हरिकीर्तन https://lokbhavanmarathinews.com/1353/raosaheb-varat-punyasmaran-sakat/

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!