अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त साकत येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नामदेव पुलवळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुकअण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त साकत येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नामदेव पुलवळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक

जामखेड प्रतिनिधी सुनिल पुलवळे

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व रजिस्टरचे वाटप करण्यात आले. या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव पुलवळे यांनी केले होते.

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात

गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती

या कार्यक्रमाला जामखेड तालुक्याचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने सर, सचिन वराट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गावातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानाभाऊ मुरूमकर, माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पुलवळे, त्रिंबक पुलवळे, अमोल पुलवळे, नामदेव पुलवळे, पत्रकार सुनील पुलवळे, प्रशांत पुलवळे, ज्ञानदेव पुलवळे, ऋषिकेश पुलवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. गरजू विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर आवश्यक मदत मिळाल्यास त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन प्रगतीस चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनमोल उपक्रम

अशा प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहू नये, यासाठी समाजातील दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. श्री.नामदेव पुलवळे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व अनमोल ठरत असून परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!