जामखेडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी:आंदोलनाचा आज तिसरा दिवस :सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ- माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट
जामखेड लोकभवन प्रतिनिधी -सुनिल पुलवळे
सेवानिवृत्तांवर अन्यायाचा आरोप
शासनाच्या धोरणांमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी केला. तीस वर्षे सेवा करूनही पेन्शन मिळत नसल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.
Advertisement

तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी जामखेड येथे संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर पेन्शन दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Advertisement

वारकरी पद्धतीने अनोखे आंदोलन
आज सकाळी दहा वाजता संपकरी कर्मचारी टाळ-पखवाज व मृदंग घेऊन तहसील आवारात दाखल झाले. शासनाला जाग आणण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात “एक, दोन, तीन, चार… पेन्शनचा जयजयकार”, “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची”, “एकच मिशन जुनी पेन्शन”, “कर्मचारी एकजुटीचा विजय असो”, “हम सब एक है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यामुळे संपूर्ण तहसील परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग
समन्वय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, सुदाम वराट, सचिव संतोष पवार, मोहन यादव, दत्तात्रय राजमाने, अनिल देडे, जाकिर शेख, भागवत चांगुणे, कैलास वराट, राघवेंद्र धनलगडे, अमोल भोंडवे, हनुमंत वराट, अर्जुन रासकर, मयूर भोसले, बबन राठोड, रोहित घोडेस्वार, त्रिंबक लोळगे, अतुल दळवी यांच्यासह शिक्षण, महसूल व आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यव्यापी संपाचा परिणाम
मंगळवार, २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपात सुमारे १७ लाख कर्मचारी सहभागी झाले असून जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर, आरोग्य व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. संपामुळे शाळा, तहसील कार्यालय, कृषी व आरोग्य विभागाची कामकाजे गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाली आहेत.

मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
साकत येथे कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न:ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत) यांचे हरिकीर्तन https://lokbhavanmarathinews.com/1353/raosaheb-varat-punyasmaran-sakat/
https://student.maharashtra.gov.in

