साकत येथे कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न:ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत) यांचे हरिकीर्तन
जामखेड लोकभवन प्रतिनिधी : सुनिल पुलवळे
साकत (ता. जामखेड) येथे कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अत्यंत भावपूर्ण वातावरणात कीर्तन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजींना भावपूर्ण आदरांजली वाहिली. संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना अनुभवायला मिळत होती.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कै. वराट गुरुजींच्या साध्या, प्रामाणिक आणि समाजाभिमुख जीवनकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान, विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले संस्कार तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेले कार्य यांची आठवण काढत उपस्थित भावूक झाले. गुरुजींनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही समाजात जाणवतो, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांचे प्रभावी हरिकीर्तन
या पुण्यस्मरणानिमित्त सकाळी ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी व विचारप्रवर्तक कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनात त्यांनी रावसाहेब वराट गुरुजी यांच्या साधेपणाने जगलेल्या आयुष्याचा, त्यांच्या अध्यात्मिक कार्याचा तसेच समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. विशेषतः, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन शिक्षक बनवले, या प्रेरणादायी उदाहरणातून शिक्षणाचे महत्त्व आणि कुटुंबासाठी केलेला त्याग अधोरेखित करण्यात आला.
उत्तम महाराजांनी गुरुजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, सदाचार, संस्कार आणि समाजसेवेचा प्रभावी संदेश देण्यात आला. कीर्तनादरम्यान उपस्थितांना अध्यात्मिक ऊर्जा, समाधान आणि जीवनदृष्टी मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
गुरुजींच्या कार्याची आठवण
कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) हे पंचायत समिती जामखेडचे माजी सभापती मा. संजय वराट सर यांचे वडील असून त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, समाजसेवा आणि संस्कार यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा आजही समाजात कायम असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी कुटुंबीयांच्या वतीने ग.भा. केशरबाई रावसाहेब वराट (पत्नी ),श्री .संजय रावसाहेब वराट सर -मुलगा (मा.सभापती जामखेड ),सौ .मंदा रवींद्र सूर्यवंशी (मुलगी ) यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. या पुण्यस्मरण सोहळ्यामुळे साकत परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि उपस्थितांनी गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये उत्तम महाराज वराट, हरिभाऊ काळे, कोकाटे महाराज, बाजीराव महाराज वराट, उतरेश्वर महाराज वराट, दीपक अडसूळ, शरद कार्ले, मा. सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सुधीर दादा राळेभात, दिगाभाऊ चव्हाण, डॉ. अविनाश पवार, बापू कार्ले, मंगेश दादा आजबे, बाळासाहेब खैरे, काका गर्जे, अनिल मामा बाबर, लक्ष्मण ढेपे, प्रविण बोलभट, अरुण वराट सर, कैलास वराट सर, महादेव वराट (पोलीस पाटील), शहादेवशेठ वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, कांतीलाल वराट, निकम सर, शिरसाठ सर, सरपंच सागर कोल्हे, अनिल भोरे, सुरेश भोरे, गजानन शिंदे, डॉ. जगताप, गौतम कोल्हे, काका चव्हाण, राम भोरे, अप्पा निकम, बबन देवकाते, महादेव वराट, विठ्ठल वराट, अजित वराट, बिबीषण वराट, भागवत वराट सर, रावसाहेब वराट सर, मुरूमकर सर, राजू वराट, अॅड. हर्षल डोके, रामहरी तावरे सर, भरत लहाने सर, सुदाम वराट सर, विनय डुकरे, सचिन वानारे, शिव सोळंके, अभिजीत उगलमोगले, जिजामाता माध्यमिक स्कूल, देवदैठण येथील शिक्षकवृंद, श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील शिक्षकवृंद तसेच साकत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकत गावाचा मान उंचावला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी सुदाम वराट तर प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ बहिर यांची निवड https://lokbhavanmarathinews.com/1343/sakat-gavacha-man-unchavla/
https://student.maharashtra.gov.in

