गितेवाडी शाळा गुणवत्तेची खाण.. उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते:विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम गितेवाडी शाळेत संपन्न…
जामखेड प्रतिनिधी सुनिल पुलवळे
जामखेड तालुक्यातील जि. प .प्रा. शाळा गितेवाडी ही शाळा गुणवत्तेची खाण असून याच गुणवत्तेच्या जोरावर या शाळेच्या पटात लक्षणीय वाढ झाली आहे. असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री दादासाहेब गिते यांनी गुणगौरव सोहळ्यात केले. गितेवाडी शाळेतील मिशन आरंभ व इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील 41 गुणवंताचा गुणगौरव सोहळा गितेवाडी शाळेत पार पडला. या यावेळी त्यांनी शिक्षक पालक व विद्यार्थी यांचे भरभरुन कौतुक करून अभिनंदन केले.

यावेळी खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक आंधळे, सिताराम गडाचे मठाधिपती ह. भ. प .महालिंग महाराज नगरे, माऊली महाराज नगरे ,ह. भ. प. सांगळे महाराज, खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, महादेव ढगे, आदर्श मुख्याध्यापक अशोक जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश होडशीळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कुंडलिक गिते मुख्याध्यापक चंद्रकांत अरण्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दादासाहेब गिते यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे कायम लक्ष देणे गरजेचे गरजेचे आहे. प्रत्येक गावाने एकजुटीने पुढाकार घेऊन शाळेचा विकास करावा. आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल देऊ नये असा मार्मिक सल्लाही त्यांनी दिला. भविष्यात गितेवाडी शाळेसाठी आपण शासकीय स्तरावरुन दोन वर्गखोल्या देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. प्रत्येक गावांनी शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे . असा मौलिक विचार अहिल्यानगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री दादासाहेब गिते यांनी दिला.


यावेळी विस्तार अधिकारी अशोक आंधळे यांनी मिशन आपुलकी अंतर्गत जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसहभाग असलेली गितेवाडी शाळा असून मिशन आरंभ परीक्षेत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शाळा असल्याचे प्रतिपादन केले. विस्तार अधिकारी श्री अशोक आंधळे यांच्या सेवापुर्तीनिमित्त शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ह. भ. प. महालिंग महाराज ,माऊली महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे गुणवंत शिक्षक श्री चंद्रकांत अरण्ये सर व रुक्मिणी पालवे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करुन सर्व मान्यवरांच्या हस्ते दोघांचाही सन्मान करण्यात आला. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या नवागतांचे स्वागतही उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी गितेवाडी ग्रामस्थ, सर्व पालक व शिक्षक यांनी अनमोल असे सहकार्य केले. मिशन आपुलकी अंतर्गत लोक सहभाग व श्रमदान देऊन कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुणवंत शिक्षक श्री चंद्रकांत अरण्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन रुक्मिणी पालवे यांनी मानले.

साकत येथे कै. रावसाहेब जगन्नाथ वराट (गुरुजी) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न:ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत) यांचे हरिकीर्तन https://lokbhavanmarathinews.com/1353/raosaheb-varat-punyasmaran-sakat/
https://student.maharashtra.gov.in

