सारोळा शाळेचा शिष्यवृत्ती गुणवत्ता पॅटर्न ठरला आदर्श; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सर्व स्तरातून कौतुकसारोळा शाळेचा शिष्यवृत्ती गुणवत्ता पॅटर्न ठरला आदर्श; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सर्व स्तरातून कौतुक

जामखेड (प्रतिनिधी) सुनिल पुलवळे

जामखेड (प्रतिनिधी):आज शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठा गौरव सन्माननीय युवराज (भाऊ) काशिद ,सरपंच अजय (दादा)काशिद,मकरंद (आबा) काशिद, केंद्रप्रमुख माजिद शेख साहेब यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.


यावेळी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सन 2026 मध्ये जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान संपादन करणारे सारोळा शाळेचे गुणवंत विद्यार्थी साक्षी गोवर्धन मुळे, पूनम राम जगदाळे व पवन दादासाहेब जगदाळे यांचा त्यांच्या पालक समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सुयशामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 7500/- रू याप्रमाणे एकूण 15000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.


इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र 13 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक तसेच NMMS परीक्षेत पात्र 11 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक राहुल लिमकर तसेच इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका अमृता रसाळ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सारोळा शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा राजुरी केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब यांचाही सपत्नीक सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. एकंदरीत सारोळा शाळेच्या उत्कृष्ट शिष्यवृत्ती गुणवत्ता पॅटर्नचे उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करत सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.


या कार्यक्रम प्रसंगी मराठा गौरव आदरणीय युवराज (भाऊ) काशिद,सरपंच अजय (दादा ) काशिद,मकरंद (आबा) काशिद , केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, पालक गोवर्धन मुळे,राम जगदाळे ,दादासाहेब जगदाळे,अंगद चव्हाण,शाळेचे मुख्याध्यापक संदिप भालसिंग,पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,श्री.राहुल लिमकर, उपाध्यापक श्री.प्रशांत होळकर ,उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते…!

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!