म्हाडाच्या कारवाईविरोधात १४ गावांचा संताप...आमदार राजेश मोरे यांच्या आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली...म्हाडाच्या कारवाईविरोधात १४ गावांचा संताप...आमदार राजेश मोरे यांच्या आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली...

ठाणे (प्रतिनिधी) : उत्तर शिव परिसरात म्हाडाकडून शासकीय गुरचरण जमिनीची जबरदस्तीने मोजणी करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. या पार्श्वभूमीवर १४ गावांतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आंदोलन छेडले असून आमदार राजेश मोरे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे म्हाडाची मोठी कारवाई तात्काळ थांबवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणावर लवकरच निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दिनांक २० मे २०२६ रोजी उत्तर शिव येथे म्हाडा संस्थेकडून गुरचरण जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही जमीन स्थानिक ग्रामस्थांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. १४ गावांतील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाविरोधात ठाम भूमिका घेतली. नागरिकांचा वाढता आक्रोश आणि आंदोलनाची तीव्रता पाहता परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

दरम्यान, आमदार राजेश मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या ठोस भूमिकेमुळे सध्या सुरू असलेली कारवाई थांबवण्यात आली असून संबंधित विषयावर अधिकृत बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

“१४ गावांतील गुरचरण जमीन ही स्थानिक ग्रामस्थांची जीवनरेखा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांची एकजूट कायम राहिल्यास १४ गावांच्या विकासाला कोणीही अडथळा आणू शकणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात श्री. बाबाजी पाटील, नगरसेवक, भरत भोईर, नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक, श्री. शशिकांत भोईर, श्री. संतोष केणे, श्री. निलेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. श्रीराम पौड, तहसीलदार, 14 गाव संघर्ष समितीचे श्री. लक्ष्मण पाटील, नगरसेवक, सौ. प्रतीक्षाताई पाटील, सौ. सविता रामचंद्र सांगळे नगरसेविका, सरपंच श्री. उमेश गायकर, वाकलन , श्री. रामनाथ पाटील, श्री. राम भोईर, श्री. गणेश जयपाल, श्री. भरत भोईर, तालुकाप्रमुख श्री. गुरुनाथ वालीलकर, श्री. जीवन वलीलकर, श्री. गुरुनाथ पाटील, श्री. रमेश पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री. कैलाश शेठ पाटील, तसेच चौदा गावातील ग्रामस्थ आणि उत्तर शिव येथील ग्रामस्थ उपस्थित असेच प्रशासनातील म्हाडा अधिकारी शिंदे साहेब तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!