करमाळा–जामखेड राज्यमार्ग क्र. ५६ च्या ४० किमी सिमेंट रस्ता कामाला गती; सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी मानले विशेष आभारकरमाळा–जामखेड राज्यमार्ग क्र. ५६ च्या ४० किमी सिमेंट रस्ता कामाला गती; सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी मानले विशेष आभार

कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या दळणवळण विकासासाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, करमाळा- जामखेड- साकत- पाटोदा या राज्य महामार्ग क्रमांक ५६ पैकी पहिल्या टप्प्यात अंदाजे ३०० कोटी रुपये खर्चाच्या करमाळा – जामखेड रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे.

Ads

महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करमाळा- जामखेड- साकत- पाटोदा या राज्य महामार्गापैकी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्चाच्या करमाळा ते जामखेड या ४० किमी लांबीच्या मार्गाचे १० मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर करण्याकरिता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे. भविष्यात हा मार्ग करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांना अधिक सक्षमपणे जोडणारा विकासमार्ग ठरणार आहे.

Ads

सध्या खराब अवस्थेत असलेला हा जुना राज्यमार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो. पोथरे, जवळा, नान्नज, बोर्ले, झिक्री यांसारखी महत्त्वाची गावे तसेच जवळा हे ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन व तीर्थक्षेत्र या मार्गालगत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते.

याच मार्गावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक, कृषी मालाची वाहतूक तसेच दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या प्रकल्पाअंतर्गत पोथरे, जवळा, बोर्ले फाटा, नान्नज, झिक्री आणि पाडळी फाटा या गावांच्या ठिकाणी तब्बल १४ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार आहे. तसेच बसथांबे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सिमेंट काँक्रीटची बांधीव गटारे उभारण्यात येणार आहेत.

यामुळे नागरिकांच्या प्रवासाला सुरक्षितता, वेग आणि सुविधा मिळणार असून परिसरातील व्यापार, शेती आणि रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.

कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी विशेष आभार मानले.

करमाळा–जामखेड राज्य महामार्ग क्र. ५६ अंतर्गत सुरू असलेल्या ४० किमी सिमेंट रस्ता कामामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असे मत जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी व्यक्त केले.

या रस्त्यामुळे करमाळा, जामखेड, साकत आणि पाटोदा परिसरातील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार असून शेतमाल वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी नागरिकांना मोठी सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी विशेष आभार मानले.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!