घणसोली रेल्वे स्थानकासमोर रिक्षाचालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन कोपरखैरणे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांचा अभिनव उपक्रमघणसोली रेल्वे स्थानकासमोर रिक्षाचालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन कोपरखैरणे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांचा अभिनव उपक्रम

घणसोली (प्रतिनिधी) : शहरातील वाढती वाहतूक व अपघातांची संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये व वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या वतीने घणसोली रेल्वे स्थानकासमोर विशेष प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक ०२ एप्रिल रोजी झालेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रिक्षाचालक-मालक तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान पीएसआय प्रकाश देशमुख साहेब व पोलीस हवालदार मोरे साहेब यांनी उपस्थित रिक्षाचालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. रिक्षा चालवताना नियमांचे पालन करणे हे केवळ कायदेशीर कर्तव्य नसून नागरिकांच्या सुरक्षेशी निगडित जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. प्रवाशांना भाडे नाकारणे टाळावे, निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी (एक्स्ट्रा सीट) घेऊ नयेत, नेहमी अधिकृत युनिफॉर्ममध्ये राहावे, वाहतूक सिग्नलचे काटेकोर पालन करावे, सिग्नल जंप करणे टाळावे तसेच प्रवाशांशी आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे, असे सांगण्यात आले. यासोबतच, एखादा अपघात झाल्यास घटनास्थळावरून निघून न जाता जखमींना तात्काळ मदत करावी व संबंधित यंत्रणांना कळवावे, असेही आवाहन करण्यात आले.

या प्रबोधन उपक्रमाद्वारे रिक्षाचालकांमध्ये जबाबदारीची भावना वाढवणे, वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लागणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित रिक्षाचालक-मालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे घणसोली परिसरात वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला

https://lokbhavanmarathinews.com

https://mhada.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!