साकत जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा डॉ. भगवानराव मुरूमकर यांची मागणी, सभापती प्रा. राम शिंदे यांची तात्काळ कार्यवाही
जामखेड लोकभवन (प्रतिनिधी) सुनिल पुलवळे
जामखेड तालुक्यातील साकत जिल्हा परिषद गटातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती जामखेडचे सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी केली आहे. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सध्या काही ठिकाणी अपुरी व अडचणीची असल्याने या रस्त्यांच्या उन्नतीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

मा.सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना पत्र
या संदर्भात डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात साकत गटातील अनेक कच्च्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यांची परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे कार्यकारी अभियंत्यांना तत्काळ पत्र
डॉ. भगवानराव मुरूमकर यांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत प्रा. राम शिंदे यांनी तत्काळ कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर व उपअभियंता बांधकाम विभाग कर्जत विभाग आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाल्यास वाहतुकीला गती
या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा अधिकृत दर्जा मिळाल्यास शासनाकडून निधी उपलब्ध होऊन रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण शक्य होईल. परिणामी वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होईल. यामुळे शिक्षण,आरोग्य व बाजारपेठांपर्यंत पोहोचणेही सोपे होणार आहे.

रस्त्यांची सुधारणा झाल्यास शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेत सहज करता येईल. तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासातील वेळ व खर्च कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनाही शाळा व महाविद्यालयात जाणे अधिक सोयीचे होईल.
प्रस्तावित प्रमुख रस्त्यांची यादी
मागणीतील प्रमुख रस्ते पुढीलप्रमाणे आहेत
साकत-जामखेड रस्ता ते साकत 33 के.व्ही. सब स्टेशन (2 किमी)
साकत ते पिंपळवाडी रस्ता (2 किमी)
साकत-जामखेड रस्ता ते गोसावी बाबा देवस्थान ते पारगाव रस्ता (3 किमी)
शिऊर-देवदैठण रस्ता ते बिंडा वस्ती (2.5 किमी)
देवदैठण ते भोरे वस्ती रस्ता (2 किमी)
योजनाबाह्य रस्त्यांच्या दर्जोन्नतीची तातडीची गरज
सदर रस्ते सध्या योजनाबाह्य असल्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देणे अत्यंत गरजेचे आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि स्थानिक नागरिकांच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे ही मागणी तातडीने मंजूर करण्यात येईल व रस्त्यांची डांबरीकरण होईल यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने मा. सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांचे आभार मानले आहेत

https://lokbhavanmarathinews.com

