IPL 2026: आजपासून IPL ला धमाकेदार सुरुवात; RCB vs SRH पहिल्या सामन्यात आमनेसामने
बंगळूर : बहुप्रतिक्षित असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) च्या 19 व्या पर्वाला आजपासून (28 मार्च) सुरूवात होणार आहे. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या उद्धाटनाचा सामना रंगणार आहे. बंगळुरू आपला पहिला सामना घरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. आजपासून सुरू होत असलेल्या आयपीएलचा अंतिम सामना 31 मे रोजी होणार आहे. एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसंच, अंतिम सामना हा बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. (ipl 2026 opening match rcb vs srh schedule venues details)

आरसीबीनं गतवर्षी आयपीएलच्या 18 व्या पर्वाचं जेतेपद पटकावलं होतं. या विजयासह मागील 18 वर्षांचा पराभवाचा दुष्काळ आरसीबीनं संपवला. त्यामुळं 19व्या पर्वाचं जेतेपद राखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. खरंतर, आयपीएल म्हणजे एकप्रकारे ‘रनोत्सव’च कारण या मालिकेत 20 षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाज कशी कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळं प्रत्येक चेंडूवर थरार, प्रत्येक षटकात नाट्य आणि प्रत्येक सामन्यात इतिहास घडण्याची शक्यता या मालिकेत पाहायला मिळते. त्यामुळं आयपीएलच्या 19 व्या पर्वात कोण विक्रमी खेळी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएलमध्ये 10 संघ असून सर्व संघ त्यांच्या होमग्राउंडवर 7 आणि विरोधी संघाच्या होमग्राउंडवर 7 सामने खेळणार आहेत. 10 संघांच्या 10 होमग्राउंड्सशिवाय, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सने प्रत्येकी 2 होमग्राउंड निवडले आहेत. राजस्थान आपले सुरुवातीचे 3 सामने गुवाहाटीमध्ये, तर 4 सामने जयपूरमध्ये खेळणार आहेत. तसेच, बंगळुरूचे दुसरे होमग्राउंड रायपूर आणि पंजाबचे मुल्लांपूर आहे. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर, मुल्लांपूर आणि गुवाहाटी ही स्पर्धेची 13 ठिकाणे आहेत. याठिकाणी लीग स्टेजचे 70 सामने होणार आहेत.

यंदा संघरचनेत मोठे बदल झाले आहेत. चेन्नईने संजू सॅमसन, मॅट हेन्री आणि नूर अहमद यांना संघात घेत नवी ताकद मिळवली आहे. महेंद्रसिंग धोनीकडून कदाचित अखेरचा जादुई हंगाम पाहायला मिळू शकतो. कोलकात्याने टिम सिफर्ट, फिन अॅलेन, रचिन रवींद्र आणि पॅमेरून ग्रीन यांना घेत फलंदाजी मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणे नेतृत्व करत संघाला एकत्र ठेवेल, तर रिंकू सिंह फिनिशरच्या भूमिकेत चमकण्यास सज्ज आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन हे गोलंदाजीतले तुरपाचे पत्ते असले तरी वेगवान गोलंदाजी त्यांची कमकुवत बाजू आहे. कोणते बदल संघाचा चेहरामोहरा बदलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी हप्ता जमा होण्यास सुरुवात; या तारखेला खात्यात येणार पैसे
https://lokbhavanmarathinews.com/1187/ladaki-bahin-yojana/
For Kyc
https://ladakibahin.maharashtra.gov.in

