"वाढदिवस साजरा करायचा तर असा!" पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्याकडून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप"वाढदिवस साजरा करायचा तर असा!" पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्याकडून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप

जामखेड प्रतिनिधी : सुनिल पुलवळे

वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श ल.ना. होशिंग माध्यमिक विद्यालय, जामखेड चे पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेशाचे वाटप केले.

श्री सुदाम वराट यांनी गेली 28 वर्षे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथे सहशिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा केली. नुकतीच त्यांना ल.ना. होशिंग माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे पर्यवेक्षक या पदावर बढती मिळाली आहे.ते माध्यमिक शिक्षक संघटना, जामखेड चे तालुकाध्यक्ष तसेच जामखेड मिडिया क्लब चे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात.

दरवर्षी आपल्या वाढदिवशी केक कापण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा श्री वराट यांनी सुरू केली आहे. यावर्षीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत श्री साकेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेशाचे वाटप केले.

“शिक्षणासाठी कोणतेही मूल मागे राहू नये” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा उपक्रम राबवला. त्यांच्या या निर्णयाचे पालक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच श्री साकेश्वर विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले.
तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी तसेच पत्रकारांच्या वतीने वराट सरांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या
.

या वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच राजाभाऊ वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीराम मुरूमकर, पोलीस पाटील महादेव वराट, शाळेचे मुख्याध्यापक भरत लहाने, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकूंद वराट, प्रसाद होशिंग, लहाने मॅडम, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सुदाम वराट यांच्या कार्याचे कौतुक केले. “असे शिक्षकच खऱ्या अर्थाने समाजाचे शिल्पकार असतात” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

सुदाम वराट हे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनामुळे त्यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे “वाढदिवस म्हणजे देण्याचा दिवस” हा संदेश संपूर्ण तालुक्यात पोहोचला आहे.एकूणच, सुदाम वराट यांनी आपल्या वाढदिवसाद्वारे शिक्षक म्हणून फक्त शिकवण्याचेच नव्हे, तर घडवण्याचेही काम केले आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!