RTE 25% प्रवेश 2026-27: 1 किमी अट रद्द; पालकांना अर्ज सुधारण्याची मोठी संधी
1 किमी अंतराची अट रद्द – शाळा निवडीचे पर्याय वाढले
राज्यातील RTE 25% प्रवेश 2026-27 प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटर अंतराची अट आता रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे ज्या पालकांनी 1 किमीच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी RTE 25% प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता 1 किमी, 1 ते 3 किमी तसेच 3 किमीपेक्षा अधिक अंतरावरील शाळांची निवड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
Unconfirm सुविधा उपलब्ध – अर्ज पुन्हा संपादित करण्याची संधी
संबंधित पालकांसाठी Parent Login मध्ये “Unconfirm” करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे सर्व पालकांनी:
- आपला सादर केलेला फॉर्म Unconfirm करावा
- नवीन पर्यायानुसार शाळांची निवड करावी
- आवश्यक ती सुधारित माहिती भरून अर्ज पुन्हा सबमिट करावा
अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या सूचना
- अर्ज भरताना राहत्या पत्त्याची माहिती व Google Location अचूक तपासावी.
- जन्मतारीख ही जन्मदाखल्याप्रमाणेच भरावी (नंतर बदलता येणार नाही).
- आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे बंधनकारक आहे.
- कागदपत्रे नसल्यास लॉटरीनंतर प्रवेश रद्द होऊ शकतो.
- अर्ज चुकल्यास सबमिट करण्यापूर्वी डिलीट करून नवीन अर्ज भरावा.
- एका बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये.
- अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर व अर्जाची प्रत जपून ठेवावी.
- चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
- पासवर्ड विसरल्यास Recover Password पर्याय वापरावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
RTE 25% प्रवेश 2026-27 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मार्च 2026 पर्यंत आहे.
विशेष बदल (2026-27)
- दिव्यांग बालकांसाठी किमान 40% दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक
- निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे
- बँक पासबुक फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच ग्राह्य
- अचूक location साठी Google Map वरून Latitude-Longitude वापरण्याचा सल्ला
मदतीसाठी संपर्क
दिव्यांग बालकांच्या जन्मतारखेबाबत अडचण आल्यास:
Email: rtemah2020@gmail.com
पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन
नवीन बदल लक्षात घेऊन सर्व पालकांनी आपला अर्ज Unconfirm करून आवश्यक ते बदल करावेत व योग्य माहिती भरूनच अंतिम अर्ज सबमिट करावा.

दिघोळ: श्री हनुमान विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा; शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://lokbhavanmarathinews.com/1138/shishak-palak-sahvichar-sabha/
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

