RTE 25 टक्के प्रवेश 2026-27 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरूRTE 25% अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून 25 March पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.

1 किमी अंतराची अट रद्द – शाळा निवडीचे पर्याय वाढले

राज्यातील RTE 25% प्रवेश 2026-27 प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटर अंतराची अट आता रद्द करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ज्या पालकांनी 1 किमीच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी RTE 25% प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता 1 किमी, 1 ते 3 किमी तसेच 3 किमीपेक्षा अधिक अंतरावरील शाळांची निवड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

संबंधित पालकांसाठी Parent Login मध्ये “Unconfirm” करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे सर्व पालकांनी:

  • आपला सादर केलेला फॉर्म Unconfirm करावा
  • नवीन पर्यायानुसार शाळांची निवड करावी
  • आवश्यक ती सुधारित माहिती भरून अर्ज पुन्हा सबमिट करावा
  1. अर्ज भरताना राहत्या पत्त्याची माहिती व Google Location अचूक तपासावी.
  2. जन्मतारीख ही जन्मदाखल्याप्रमाणेच भरावी (नंतर बदलता येणार नाही).
  3. आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे बंधनकारक आहे.
  4. कागदपत्रे नसल्यास लॉटरीनंतर प्रवेश रद्द होऊ शकतो.
  5. अर्ज चुकल्यास सबमिट करण्यापूर्वी डिलीट करून नवीन अर्ज भरावा.
  6. एका बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये.
  7. अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर व अर्जाची प्रत जपून ठेवावी.
  8. चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
  9. पासवर्ड विसरल्यास Recover Password पर्याय वापरावा.

RTE 25% प्रवेश 2026-27 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मार्च 2026 पर्यंत आहे.

  • दिव्यांग बालकांसाठी किमान 40% दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक
  • निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे
  • बँक पासबुक फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच ग्राह्य
  • अचूक location साठी Google Map वरून Latitude-Longitude वापरण्याचा सल्ला

दिव्यांग बालकांच्या जन्मतारखेबाबत अडचण आल्यास:
Email: rtemah2020@gmail.com

नवीन बदल लक्षात घेऊन सर्व पालकांनी आपला अर्ज Unconfirm करून आवश्यक ते बदल करावेत व योग्य माहिती भरूनच अंतिम अर्ज सबमिट करावा.

दिघोळ: श्री हनुमान विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा; शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://lokbhavanmarathinews.com/1138/shishak-palak-sahvichar-sabha/

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!