राजवीर क्लिनिकल लॅब चे संचालक श्री.नवनाथ खोत यांच्या तर्फे खर्डा परिसरातील विविध शाळेत मोफत रक्तगट तपासणी शिबिर
जामखेड |खर्डा (प्रतिनिधी) प्रतिनिधी सुनिल पुलवळे
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे मोफत रक्तगट तपासणी शिबिर खर्डा परिसरातील विविध शाळांमध्ये उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्र खर्डा तसेच परिसरातील इतर शाळांमध्ये आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे आयोजन राजवीर क्लिनिकल लॅब चे संचालक श्री. नवनाथ सुदाम खोत यांच्या पुढाकारातून करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जवळपास 250 विद्यार्थ्यांची विनामूल्य रक्तगट तपासणी करून दिली. शिबिरादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याची अचूक तपासणी करून त्यांना रक्तगटाचे प्रमाणपत्रही देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याचा रक्तगट माहिती असणे अत्यावश्यक आहे. विशेषतः शालेय सहली, क्रीडा स्पर्धा किंवा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी रक्तगटाची माहिती त्वरित उपलब्ध असणे जीवनरक्षक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर श्री. नवनाथ खोत यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकवर्गाने या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री. खोत यांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
खर्डा परिसरात आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे शिबिर एक सकारात्मक पाऊल ठरले असून, समाजातील इतर संस्थांनीही अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या शिबिरामध्ये एकूण अंदाजे २०० ते २५० विद्यार्थ्यांची विनामूल्य रक्तगट तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी तपासणीची संख्या पुढीलप्रमाणे होती:
वंजारवाडी – ५० विद्यार्थी
गीतेवाडी – ४५ विद्यार्थी
गांधनेश्वर वस्ती – १० विद्यार्थी
गवळवाडी – २४ विद्यार्थी
वाकी – ४० ते ५० विद्यार्थी
खर्डा बॉईज शाळा – ५० ते ६० विद्यार्थी

सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व : राजवीर क्लिनिकल लॅबचे संचालक श्री. नवनाथ खोत
खर्डा परिसरात आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर नाव म्हणून राजवीर क्लिनिकल लॅबचे संचालक श्री. नवनाथ सुदाम खोत यांची ओळख निर्माण झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असताना समाजाप्रती असलेली जबाबदारी ते सातत्याने जपत आहेत.
श्री. खोत हे केवळ व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून काम न करता समाजहिताचा विचार प्राधान्याने करतात. ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात व अचूक निदान सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची मोफत किंवा सवलतीच्या दरात तपासणी करून त्यांनी मानवतेचा आदर्श ठेवला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विविध शाळांमध्ये मोफत रक्तगट तपासणी शिबिरे आयोजित केली. अशा उपक्रमांमुळे पालकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली. आपत्कालीन परिस्थितीत रक्तगटाची माहिती किती महत्त्वाची असते, याची जाणीव करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
कोरोना काळातही त्यांनी गरजू नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक तपासण्या उपलब्ध करून दिल्या. आरोग्यविषयक जनजागृती, शिबिरे, तसेच सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय सहभाग घेत असतात.
“समाजाने आपल्याला दिले आहे, त्याचे ऋण फेडणे ही आपली जबाबदारी आहे,” या भूमिकेतून श्री. नवनाथ खोत सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे खर्डा परिसरात त्यांच्याबद्दल आदर व विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जपत कार्य करणारे श्री. नवनाथ खोत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख उद्योजक म्हणून ओळखले जातात.

चर्चेतली बातमी
जि.प.प्रा. केंद्र शाळा साकत येथे बाल आनंद बाजार हा अभिनव उपक्रम संपन्न
https://lokbhavanmarathinews.com/925/bal-anand-bazar-sakat-2026/
सिडको लॉटरी २०२६ वेबसाईट

