कल्याण लोकसभा मतदारसंघ विकास प्रकल्पकल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांची पाहणी करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे साहेब

कल्याण

कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या महत्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पांना मोठे बळ मिळाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या २०२६-२७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात या मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे या प्रकल्पांना गती मिळाली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

या निधीमुळे मेट्रो, रस्ते, उन्नत मार्ग तसेच पहिला डबल डेकर उन्नत मार्ग मार्गी लागणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

पलावा येथे दुसऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. याच भागातील जुना रेल्वे पूल हटवून नव्या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक अधिक गतीमान होणार आहे.

ऐरोली–काटई उन्नत मार्ग (फ्रीवे) टप्पा ३ साठी यंदाच्या अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काटई भागात मेट्रो, एक्सेस कंट्रोल मार्ग आणि ऐरोली–काटई मार्ग उतरतो. याच मार्गावरून डबल डेकर उन्नत मार्गही जाणार असून रिंग रोडचा एक महत्त्वाचा टप्पाही येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणाचा ऐतिहासिक निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला असून मेट्रो १२A प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या विस्तारित मार्गामुळे विस्तारीत डोंबिवली, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण आणि खुतारी गाव या भागांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच मेट्रो १२ च्या कामासाठी यंदाच्या वर्षात १ हजार ५४.५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तिसऱ्या पत्री पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या पुलामुळे कल्याण परिसरातील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

कल्याण रिंग रोड प्रकल्पासाठी ६०० कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यासाठीही निधी उपलब्ध झाला आहे. टप्पा क्रमांक ४, ५ आणि ६ सध्या सेवेत असून उर्वरित टप्पेही लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत.

ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो ५ मार्गासाठी १ हजार ३०९.९० कोटी, दुर्गाडी ते उल्हासनगर–अंबरनाथ मेट्रो ५A मार्गासाठी १८३.३५ कोटी, तर कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ साठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे उपनगरीय भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि जलद होणार आहे.

अनेक प्रकल्पांतील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून निधी उपलब्ध झाल्याने सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पांना गती दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच एमएमआरडीए प्रशासनाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले. यावेळी आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा राजेश मोरे साहेब , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, महसूल विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर, उपमहापौर, आयुक्त, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

या भरीव निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

ही पण बातमी पहा

RTE 25% Admission 2026-27: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत

https://lokbhavanmarathinews.com/759/rte-25-admission-2026-27-online-application-last-date-28-february/

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या ४,८९७.१९ कोटी रुपयांच्या भरीव निधीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ विकास प्रकल्प प्रत्यक्षात वेग घेऊ लागले आहेत. मेट्रो १२ व १२A, मेट्रो ५, ५A, १४, ऐरोली–काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड, तिसरा पत्री पूल आणि विविध उड्डाणपूल यांसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास वाहतूक व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्य शासनाच्या निर्णयक्षमतेमुळे या विकासकामांना गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघात पायाभूत सुविधांचा मजबूत पाया तयार होत आहे.

या सर्व प्रकल्पांची वेळेत आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी झाली तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार असून हा विकासवर्षाव भविष्यातील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!