घणसोली फ समिती कार्यालयात नागरिकांच्या वीज समस्यांबाबत आयोजित बैठकीत लोकप्रतिनिधी व महावितरण अधिकारी उपस्थित.घणसोली फ समिती कार्यालयात नागरिकांच्या वीज समस्यांबाबत आयोजित बैठकीत लोकप्रतिनिधी व महावितरण अधिकारी उपस्थित.

घणसोली | प्रतिनिधी

घणसोली–तळवली परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत घणसोली फ समिती कार्यालय (वार्ड ऑफिस) येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील विद्युत पुरवठ्याशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगरसेवक गणेश सकपाळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अवास्तव वीज बिले, नादुरुस्त डीपी, अपुऱ्या व जुन्या केबल्स, वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरची गरज तसेच नवीन सब-स्टेशन उभारणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

यावेळी संबंधित समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बैठकीस नगरसेवक गणेश सकपाळ,नगरसेविका ललिता मढवी, नगरसेवक लक्ष्मण पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे, महावितरणचे अधिकारी तसेच विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक गणेश सकपाळ यांनी घणसोली–तळवली परिसरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. परिसरातील प्रत्येक प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!