शेतकरी कन्या चंदना विक्रम उगले यांची पोलीसपदी निवड; ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथमशेतकरी कन्या चंदना विक्रम उगले यांची पोलीसपदी निवड; ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम

नायगावच्या शेतकरी कुटुंबातील लेकीची यशोगाथा
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील एका साध्या शेतकरी कुटुंबातील कन्या चंदना विक्रम उगले यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर पोलीस पदावर निवड मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंदना उगले यांचे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करणारे आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि ग्रामीण भागातील आव्हानात्मक परिस्थिती यांचा सामना करत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगून त्यांनी पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नायगाव येथे पहिले ते चौथीपर्यंत झाले. त्यानंतर पाचवी ते दहावी शिक्षण पंचक्रोशी विद्यालय, नायगाव येथे पूर्ण केले. पुढे अकरावी-बारावी शिक्षण ल. ना. होशिंग ज्युनियर कॉलेज, जामखेड येथे घेतले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी जामखेड महाविद्यालयात प्रवेश घेतला असून त्या पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होत्या.

पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा आणि इतर सर्व टप्पे पार करत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी 150 पैकी तब्बल 121 गुण मिळवत ओबीसी प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची चिकाटी यांचा मोठा वाटा आहे.

चंदना उगले यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते,” हा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

श्री साकेश्वर महाराज यात्रा उत्सवास सोमवार पासून प्रारंभ :तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन:निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान व भव्य बैलगाडा शर्यत विशेष आकर्षण https://lokbhavanmarathinews.com/1237/shri-sakeshwar-maharaj-yatra/

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!