पिंपळवाडी (साकत )येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळापिंपळवाडी (साकत )येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल २०२६ पासून सुरू होणारा हा धार्मिक सोहळा २१ एप्रिल २०२६ रोजी सांगता होणार असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष असून या सोहळ्याची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.

या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. दत्ता महाराज येवले (सोनेगांवकर) करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस अखंड हरिनाम, भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज सायंकाळी श्री रामकृष्णहरी नामजप होणार असून त्याचे नेतृत्वही दत्ता महाराज येवले करणार आहेत.

दैनिक कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ – काकडा आरती
६ ते ७ – विष्णुसहस्त्रनाम
७ ते १० – ज्ञानेश्वरी पारायण
१० ते १२ – भजन
१२ ते १ – भोजन विश्रांती
४ ते ६ – हरिपाठ
सायं. ७ ते ९ – हरिकीर्तन
रात्री ९ ते ११ – हरिजागर

  • 📅 १४ एप्रिल – ह.भ.प. ऋषिकेश महाराज जरे (मातकुळी)
  • 📅 १५ एप्रिल – ह.भ.प. वेदमूर्ती शंकरजी महाराज (मातोरी)
  • 📅 १६ एप्रिल – ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत)
  • 📅 १७ एप्रिल – ह.भ.प. शिवाजी महाराज येवले (नायगाव)
  • 📅 १८ एप्रिल – ह.भ.प. महंत स्वामी जनार्दन महाराज (निमगाव मायंबा)
  • 📅 १९ एप्रिल – ह.भ.प. कैलास महाराज भोरे (देवदैठण)
  • 📅 २० एप्रिल – ह.भ.प. माऊली महाराज कोठुळे (जवळाला)

📅 २१ एप्रिल २०२६ रोजी

  • सकाळी ७ ते ९ – दिंडी प्रदक्षिणा
  • सकाळी १० ते १२ – गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (डिकसळकर) यांचे कीर्तन
  • 👉 नंतर महाप्रसाद

हा भव्य धार्मिक सोहळा पिंपळवाडी (साकत) येथील समस्त गावकरी मंडळींच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून समाजात एकोपा, श्रद्धा आणि अध्यात्मिक मूल्ये वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.कर्जत – जामखेडमधील १४० शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण.सभापती प्रा. राम शिंदे यांचा पुढाकार

https://lokbhavanmarathinews.com/1298/ram-shinde-2/

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!