राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील एकूण ३०८८ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गट-क पदांच्या १५३९ जागा, लिपिक-टंकलेखक (विविध विभाग) पदांच्या १२७३ जागा आणि इतर वरिष्ठ अभिलेखापाल/ वरिष्ठ लिपिक/ अभिलेखापाल/ सहाय्यक अधीक्षक/ सहाय्यक मत्स व्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) पदांच्या २७६ जागा अशा एकूण ३०८८ जागा

संवैधानिक विद्यापीठातून कुठल्याही शाखेतून पदवी किंवा मत्सविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतून पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह आवश्यक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!