इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सारोळा शाळेची उल्लेखनीय कामगिरी...!इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सारोळा शाळेची उल्लेखनीय कामगिरी...!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, केंद्र-राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल १५ विद्यार्थी पात्र झाले असून इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशामुळे, ग्रामीण भागात असणाऱ्या सारोळा जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्ता पॅटर्नची सर्व परिसरात चर्चा होत असून, शाळेवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.

Ads

इयत्ता पाचवी मध्ये शाश्वती राहुल लिमकर (२१४),साईराज सचिन आजबे (२०६),आयुष अंगद चव्हाण (२०२),समता सचिन म्हस्के (२०२),आदित्य संदीप धाऊड (२००),प्रगती विठ्ठल पवार (१८६),सार्थक विलास गाडे (१८०),स्वरा धनाजी पवार (१६४),विराज विश्वनाथ डाडर (१६०),श्रेयश पिराजी टिकनूर (१५०),अविराज अशोक गळगटे (१४२),समीक्षा गोवर्धन मुळे (१३२),यशराज ऋषिकेश कदम (१३२),अवनीश योगेश कानडे (१२८),श्रेयश दिपक काळे (१२८) या विद्यार्थ्यांनी सदर गुण संपादन करत उल्लेखनीय यश संपादन केले.तर इयत्ता आठवी मध्ये साक्षी गोवर्धन मुळे (२२८),पूनम राम जगदाळे (१९४),पवन दादासाहेब जगदाळे (१९२),आरती महारुद्र आजबे (१८०),पवन गोकुळ ढोले (१८०),मधुरा महेश थोरात (१७४),माऊली लहू जगदाळे (१७०),प्रितम परमेश्वर हुलगुंडे (१६२),संभव सुनिल बहिर (१६२),मधुरा राजेंद्र पवार (१६०),महेश बाळासाहेब काशिद (१५८),ओमकार गणेश हुलगुंडे (१५४),अनुष्का संदिप रिठे (१४६) या विद्यार्थ्यांनी सदर गुण संपादन करत प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांना ग्रेड मुख्याध्यापक संदिप भालसिंग सर,इयत्ता ५ वी वर्गशिक्षिका अमृता रसाळ ,इयत्ता ८ वी वर्गशिक्षक राहुल लिमकर तसेच मार्गदर्शक शिक्षक सुरेश बर्वे, प्रशांत होळकर,शबाना शेख व वृषाली खांदवे यांचे मार्गदर्शन लाभले.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!