SQAAF मूल्यांकन मध्ये राज्यस्तरावर बहुमान संपादन केल्याबद्दल सारोळा प्रशालेचा सन्मानSQAAF मूल्यांकन मध्ये राज्यस्तरावर बहुमान संपादन केल्याबद्दल सारोळा प्रशालेचा सन्मान

जामखेड (प्रतिनिधी):सुनिल पुलवळे

SQAAF (शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा) हे शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तेच्या हमीसाठी तयार केलेले एक महत्वाचे स्व-मूल्यांकन साधन आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वकांक्षी उपक्रम असून तो NCERT च्या ‘पारख’ (PARAKH) अंतर्गत येतो आणि शाळांना पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम व नेतृत्वाची मानके तपासून सुधारणा करण्यास मदत करतो.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या प्रशालेने SQAAF 2024-25 स्वयं व बाह्य मूल्यांकन मध्ये अ+ श्रेणी संपादन करून राज्यस्तरावर बहुमान प्राप्त केला.सदर उपक्रमाच्या माध्यमातून सारोळा प्रशालेने विद्यार्थी विकास व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अमूल्य योगदान दिले आहे.याबद्दल शाळेचे नूतन ग्रेड मुख्याध्यापक संदिप भालसिंग सर यांचा सन्मान जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आनंदजी भंडारी साहेब व प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला.

सदर सन्मान हा दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (DPRC) अकोळनेर,ता.नगर येथील ज्ञानोत्सव कार्यक्रम यामध्ये करण्यात आला.
तसेच दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सारोळा प्रशालेच्या वार्षिक तपासणी निमित्त उपस्थित असणारे, राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब,संपूर्ण CRG टीम व राजुरी केंद्रातील सर्व उपक्रमशील शिक्षक यांनी राजुरी केंद्राच्या वतीने सारोळा प्रशालेने SQAAF मूल्यांकनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सारोळा प्रशालेतील संपूर्ण शिक्षक टीमचा सन्मान केला.


यावेळी राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब,पदवीधर शिक्षक गौतम सोले सर,वैशाली घुमरे मॅडम (पाडळी),अशोक राऊत सर,संगीता नेवसे मॅडम (काटेवाडी),मारुती साबळे सर,संजय राऊत सर (घोडेगाव),बाळासाहेब जरांडे सर (पवारवस्ती),मनोज दळवी सर (बोराटे मोहितेवस्ती ),रविंद तांबे सर (बसरवाडी),विठ्ठल पवार सर ( पिंपळगाव आळवा) तसेच सारोळा प्रशालेतील ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग सर, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे सर,राहुल लिमकर सर,उपाध्यापक प्रशांत होळकर सर, उपाध्यापिका शबाना शेख मॅडम,वृषाली खांदवे मॅडम व अमृता रसाळ मॅडम उपस्थित होते.

श्री साकेश्वर केसरी २०२६ चे मानकरी ठरले पै.भारत मदने पै.चिराग मंगेश (दादा )आजबे यांच्याकडून १ लाख ७१ रुपये तर श्रीराम घोडेस्वार यांच्याकडून चषक प्रदान

https://lokbhavanmarathinews.com/1276/shri-sakeshwar-kesari-2026/

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!