मुसळधार पावसात नागरिकांच्या मदतीला नगरसेवक गणेश सकपाळ; पूरस्थितीची पाहणी, तातडीच्या उपाययोजनांचे आदेशमुसळधार पावसात नागरिकांच्या मदतीला नगरसेवक गणेश सकपाळ; पूरस्थितीची पाहणी, तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा आरोग्य विभागाचे उपसभापती गणेश सकपाळ यांनी समर्थ नगर, साई सदानंद नगर आणि गणेश नगर परिसरांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


यावेळी त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेत संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. साचलेले पाणी पंपाच्या सहाय्याने तातडीने उपसण्याचे तसेच आवश्यक उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येक तक्रारीवर शक्य तितक्या जलद गतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या.


दरम्यान, घणसोली विभाग कार्यालयात आरोग्य विभागाची विशेष बैठक घेऊन पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, साथीच्या आजारांचा प्रतिबंध, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश गणेश सकपाळ यांनी दिले.


यावेळी गणेश सकपाळ म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”
पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!