RTE 25 टक्के प्रवेश 2026-27 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरूRTE 25% अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.

नवी मुंबई | प्रतिनिधी

RTE 25% Admission 2026-27

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी आज, 17 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, पोलीस कल्याणकारी (विनाअनुदानित) तसेच महानगरपालिका स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राज्यभरातील पालकांना 17 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून शासनाने यासाठी अधिकृत पोर्टल जाहीर केले आहे.

या पोर्टलवर अर्ज भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

यंदा राज्यातील एकूण 8,450 शाळांमध्ये आरटीई 25% अंतर्गत 1 लाख 12 हजार 400 जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17,478 जागा उपलब्ध असून ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर आणि नागपूर जिल्ह्यांचा अनुक्रमे पुढील क्रमांक लागतो.

शहरी भागात अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पालकांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • RTE २५ % प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/02/2026 पर्यंत राहील.
  • 1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  • 2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  • 3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
  • 4) सन २०२६-२७ साठी फक्त १ किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील.
  • प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.
  • 5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  • 6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  • 7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • 8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  • 9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  • 10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  • 11) RTE २५ % प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/02/2026 पर्यंत राहील.
  • 12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • 13) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  • 14) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • 15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Lattitude,Longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

अर्ज प्रक्रियेनंतर सर्व पात्र अर्जांमधून संगणकीय पद्धतीने ऑनलाईन सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

  • पालकांचे आधारकार्ड
  • बालकाचा जन्म दाखला
  • रहिवासी पुरावा (आधार, मतदान ओळखपत्र, वीज बिल इ.)
  • उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनाथ किंवा एकल पालक प्रमाणपत्र (लागू असल्यास)

कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट आणि वाचनीय असावीत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज भरताना मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अचूक नोंदवावा.
  • शाळांची निवड करताना अंतर व सोयीचा विचार करावा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा.
  • सोडत निकाल व पुढील प्रक्रिया नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर तपासावी.

आरटीई 25% प्रवेश योजना ही दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे पात्र पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित शिक्षण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!