विजयाच्या गुलालापासून विकासाच्या शिखरापर्यंत... अवघ्या ५ महिन्यांत घणसोलीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाव – नगरसेवक सौरभ दादा शिंदे!विजयाच्या गुलालापासून विकासाच्या शिखरापर्यंत... अवघ्या ५ महिन्यांत घणसोलीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाव – नगरसेवक सौरभ दादा शिंदे!

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना सेक्टर ७ येथील मैदानात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक फेरीसोबत नागरिकांची धडधड वाढत होती. प्रभाग क्रमांक ०९ मधील निकालाकडे संपूर्ण घणसोलीचे लक्ष लागले होते. अखेर विजयाची घोषणा होताच जल्लोषाला उधाण आले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि विजयाच्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या विजयाने केवळ एक लोकप्रतिनिधी निवडून आला नाही, तर जनतेच्या आशा-अपेक्षांना नवे बळ मिळाले.

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर श्री. सौरभ दादा शिंदे यांनी “जनतेची सेवा हाच माझा धर्म” या भावनेने कामाला सुरुवात केली. आज अवघ्या पाच महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरिकांच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभा राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विजयाच्या गुलालापासून विकासाच्या शिखरापर्यंत... अवघ्या ५ महिन्यांत घणसोलीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाव – नगरसेवक सौरभ दादा शिंदे!
विजयाच्या गुलालापासून विकासाच्या शिखरापर्यंत… अवघ्या ५ महिन्यांत घणसोलीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाव – नगरसेवक सौरभ दादा शिंदे!

दिवस असो वा मध्यरात्र… पाणी, वीज किंवा इतर कोणतीही नागरी समस्या उद्भवल्यास नागरिकांच्या एका फोनवर दादा स्वतः घटनास्थळी पोहोचल्याची अनेक उदाहरणे प्रभागातील नागरिकांनी अनुभवली आहेत. पाणीटंचाईच्या काळात टँकर उपलब्ध करून देणे, वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तत्काळ पाठपुरावा करणे, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देणे ही त्यांची कार्यपद्धती जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

अवघ्या पाच महिन्यांत प्रभागातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, परिसर सुशोभीकरण, स्वच्छता उपक्रम, मच्छर फवारणी तसेच नागरिकांच्या मागणीनुसार अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे, वाचनालय आणि बसण्यासाठी बाकडे उभारून त्यांच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रातही सौरभ दादा शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय काम सुरू आहे. मोफत नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंत तपासणी, महिलांसाठी योग वर्ग, शिवणकला प्रशिक्षण, दुचाकी प्रशिक्षण आणि रोजगार मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांचा लाभ शेकडो नागरिक घेत आहेत. समाजातील विविध घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे नागरिकांकडून विशेष स्वागत होत आहे.

सांस्कृतिक क्षेत्रातही घणसोलीला नवी ऊर्जा मिळाली आहे. दहीहंडी, नवरात्रोत्सवातील मराठी दांडिया महोत्सव, हिंदू शोभायात्रा, दिवाळी रोषणाई आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे घणसोलीच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. समाजाला एकत्र आणणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे हे उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरले असून, परिसरात एकात्मतेचे वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आज पाच महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते—सौरभ दादा शिंदे हे केवळ नगरसेवक नाहीत, तर जनतेच्या विश्वासाचे नाव आहेत. प्रत्येक नागरिकाला आपलेसे वाटणारे, त्यांच्या प्रश्नांना स्वतःचे प्रश्न समजून सोडवणारे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.

दादा, गेल्या पाच महिन्यांत केलेल्या कार्याची पोचपावती संपूर्ण घणसोली देत आहे. पुढील काळातही आपल्या हातून अशीच लोकहिताची, विकासाभिमुख आणि प्रेरणादायी कामे घडत राहोत, हीच सर्व घणसोलीकरांची मनापासून सदिच्छा व्यक्त होत आहे.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!