जामखेड:गॅस सिलेंडर काळाबाजार तात्काळ बंद करा, अन्यथा आमदार-खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करू – ॲड. डॉ. अरुण आबा जाधवजामखेड:गॅस सिलेंडर काळाबाजार तात्काळ बंद करा, अन्यथा आमदार-खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करू – ॲड. डॉ. अरुण आबा जाधव

जामखेड:गॅस सिलेंडर काळाबाजार तात्काळ बंद करा, अन्यथा आमदार-खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करू – ॲड. डॉ. अरुण आबा जाधव

दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने गॅस सिलेंडरच्या कृत्रिम टंचाई व काळाबाजाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक चुल पेटवून “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण आबा जाधव व नगरसेविका संगीता ताई भालेराव यांनी केले.

यावेळी बोलताना अरुण आबा जाधव म्हणाले की, देशभरात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असून ती नियोजनबद्ध असल्याचा संशय जनतेमध्ये आहे. याचा फायदा घेत काही दलाल व संबंधित यंत्रणा सर्वसामान्यांची आर्थिक लूट करत आहेत.

सध्या ९१६ रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर बाजारातून गायब झाला असून तोच सिलेंडर ४,००० ते ५,००० रुपयांना काळ्या बाजारात विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला. महिला, गृहिणी, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.

सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमावत आहेत. ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.


आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या मांडल्या:

  1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करावा.
  2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
  3. जादा दराने विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून परवाने रद्द करावेत.
  4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
  5. नागरिकांना योग्य दरात नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून द्यावा.

मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा अरुण जाधव यांनी दिला. यावेळी तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन देण्यात आले.

बापू ओहोळ, अनिल सदाफुले, सलीम मदारी, रजनी औटी, मनीषा जाधव यांसह सुमित भालेराव, अंकल घायतडक, मच्छिंद्र जाधव, संदीप आखाडे, विशाल गव्हाळे, हरी जाधव, नितीन जाधव, सचिन चव्हाण, ललिता पवार, सुरेखा सदाफुले, भीमराव चव्हाण, ऋषी गायकवाड, पूजा जाधव, रोहिणी काळे, राजू जाधव, साहिल जाधव, आलेश काळे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

https://lokbhavanmarathinews.com

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!