सारोळा प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला १,४२,८८७ रुपयांचे बक्षीस :वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात संपन्न; सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली प्रेक्षकांची मने
जामखेड लोकभवन प्रतिनिधी :सुनिल पुलवळे
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे प्रभावी माध्यम म्हणजे शालेय स्नेहसंमेलन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, केंद्र-राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर या प्रशालेचे शैक्षणिक वर्ष 2025–26 चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार, दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सारोळा प्रशालेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाले. श्री. हनुमान जन्मोत्सव व सारोळा ग्राम यात्रा याचे औचित्य साधत प्रशालेच्या वतीने भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात
अवकाळी संभाव्य पावसाचा अंदाज असल्यामुळे उद्घाटन कार्यक्रम संक्षिप्त स्वरूपात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सारोळा गावचे सरपंच रितुताई अजयदादा काशिद, मान्यवर अतिथी म्हणून उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशिद, अजयदादा काशिद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख माजीद शेख, विक्रम बडे व पांडुरंग मोहळकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे यांची उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवर अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करत व बालकलाकारांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून सदर स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.

शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव
यावेळी सारोळा प्रशालेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, SQAAF मूल्यांकन, विविध गुणदर्शन व क्रीडा स्पर्धा तसेच NMMS, शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या शालेय स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, जिल्हास्तर विज्ञान परीक्षा व आविष्कार सहल यामध्ये संपादन केलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचा नितांत अभिमान व गर्व असल्याचे मत सरपंच अजयदादा काशिद यांनी व्यक्त केले.

30 कलाविष्कारांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पहिली ते आठवी पर्यंतच्या विविध विद्यार्थ्यांनी बालगीत, राष्ट्रभक्तीपर गीत, शिवगीत, शेतकरी गीत, महाराष्ट्राची लोकपरंपरा व विविध मराठी सण, ऑपरेशन सिंदूर, मराठी व हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध गीते, “येडाई माझा जीव”, “नमो आदेश” यांसारख्या विविध देवदेवतांच्या गीतांवर आधारित अप्रतिम नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

उपस्थित माता, पालक, शिक्षक वृंद, मान्यवर व्यक्ती व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकूण 30 कलाविष्कारांना सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल एक लाख बेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी (1,42,887/-) रुपयांचा बक्षीस स्वरूपात लोकसहभाग प्राप्त करून दिला.
शिक्षक व मान्यवरांचा सन्मान
सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नूतन केंद्रप्रमुख माजीद शेख साहेब व शबाना शेख मॅडम तसेच नूतन ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग सर तसेच नव्याने रुजू झालेले सुरेश बर्वे सर व वृषाली खांदवे मॅडम यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आयोजन व व्यवस्थापनात सर्वांचा सहभाग
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग, सूत्रसंचालन प्रशांत होळकर व श्री. सुरेश बर्वे, आभार राहुल लिमकर यांनी व्यक्त केले. तर विद्यार्थी वेशभूषा व ड्रेपरी यांचे संयोजन अमृता रसाळ, वृषाली खांदवे मॅडम व शबाना शेख मॅडम यांनी केले.
साऊंड सिस्टीम व्यवस्था यासीनभाई हळगाव यांनी पाहिली, तर संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचे काम मनोज फोटोग्राफर, जामखेड यांनी केले.

ग्रामस्थ व पालकांचा मोलाचा सहभाग
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व सदस्य, वि.का. सोसायटी, पोलिस पाटील, सर्व माता, पालक व ग्रामस्थ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले.

जामखेड:गॅस सिलेंडर काळाबाजार तात्काळ बंद करा, अन्यथा आमदार-खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करू – ॲड. डॉ. अरुण आबा जाधव https://lokbhavanmarathinews.com/1256/jamkhed/
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

