जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात बी.के. शिंदे ज्युनियर कॉलेजचा दबदबा :बारावी सायन्स शाखेचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
जामखेड प्रतिनिधी सुनिल पुलवळे
जामखेड : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशन संचलित बी.के. शिंदे ज्युनियर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत शानदार यश संपादन करत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दि. २ मे रोजी जाहीर झालेल्या बारावी (एच.एस.सी.) बोर्ड परीक्षा सन २०२५-२६ च्या निकालात महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग आणि काटेकोर नियोजन यांच्या बळावर महाविद्यालयाने कमी कालावधीत मोठी शैक्षणिक झेप घेतली आहे. विशेष म्हणजे केवळ बोर्ड परीक्षाच नव्हे तर जी, नीट आणि एम.एच.टी.-सी.ई.टी. सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवले उज्ज्वल यश
यंदाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी नोंदवली आहे.
सायन्स शाखेतील गुणवंत विद्यार्थी
प्रथम : सबुरी भंडारी – ८८.३३%
द्वितीय : अभिजीत निकम – ८७.८३%
द्वितीय : शिवम अंदुरे – ८७.८३%
तृतीय : सोनाली काकडे – ८७.५०%
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे. याशिवाय तब्बल २८ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत गुणवंत यादीत स्थान मिळवले आहे. सायन्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मिळत आहे नवे व्यासपीठ
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर महाविद्यालयाचा विशेष भर आहे. डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर आधारित अध्यापन, ऑनलाइन टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन आणि नियमित सराव परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे पालकांनीही सांगितले.
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. त्यामुळे जी, नीट आणि एम.एच.टी.-सी.ई.टी. सारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यास मोठी मदत होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच करिअर मार्गदर्शनावरही विशेष भर दिला जात आहे.
Ads

विविध अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी
बी. के. शिंदे शैक्षणिक संकुल हे केवळ बारावी शिक्षणापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावरही भर देत आहे. संस्थेमार्फत डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (रक्त व लघवी तपासणी), टायपरायटिंग मराठी-इंग्रजी (३०/४०), स्वयंप्रेरित अभ्यासिका तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्थेबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे.
Ads

संस्थेकडून समाधान व्यक्त
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगल बाळासाहेब शिंदे तसेच सचिव बाळासाहेब शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षक, पालक आणि संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे.

कोल्हेवाडी (साकत) येथील आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड; ग्रामस्थांकडून भव्य मिरवणूक व नागरी सत्कार https://lokbhavanmarathinews.com/1385/aakash-dare/
https://student.maharashtra.gov.in

