शिरढोण म्हाडा संकुलात डॉ .बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती उत्साहात साजरी : जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शिरढोण येथील म्हाडा संकुलात स्वप्नपूर्ती सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ध्वजस्तंभाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला शिरढोण म्हाडा संकुलातील रहिवासी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पंचशील पठणाने कार्यक्रमाची सुरुवात –
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. फुलचंद खोत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील देवरे सर होते,सचिव मनीष डवले, राहुल सावंत, रवींद्र जाधव आणि संजय कोठावळे यांनी व्यासपीठ भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील पठणाने झाली. माने ताई, शिंदे ताई, खंदारे ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पठण भावपूर्ण पद्धतीने सादर केले.
महापुरुषांना मानवंदना व अभिवादन –
सकाळच्या सत्रात महापुरुषांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांना मानवंदना व हार-पुष्प अर्पण करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात प्रस्तावना, पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन असे विविध उपक्रम पार पडले. उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
प्रा. सुनील देवरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान –
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे एस. पी. जैन ज्युनियर कॉलेज, नागोठणे येथील प्रा. सुनील देवरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत परंपरा, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा मिळाली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रंगली मैफल-
कार्यक्रमात लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेत पोवाडे व भाषणे सादर केली. सुबोध माने, श्राव्य म्हात्रे, अर्णव करांडे आणि ऋतुजा गायकवाड यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमस्थळी रांगोळीच्या आकर्षक कलाकृतींनी विशेष लक्ष वेधून घेतले. वैदही कानडे, रिया राणे आणि योगिता खोराटे यांनी साकारलेल्या सुंदर व कल्पक रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली
मंडळ पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान-
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. फुलचंद खोत यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम शिंदे, रवींद्र राणे, हरीश कर्हेकर, संतोष खारवार, लहू खोराटे, ओमकार कानडे, संकेत साठे, प्रमोद खंदारे, संदेश म्हात्रे, देविदास लोखरे, दीपक सोनवणे, रवींद्र मालव, शारदाप्रसाद यादव तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अन्नदान उपक्रमातून सामाजिक एकात्मता-
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. नयना नांदवडेकर, शारदाप्रसाद यादव, लता खरात, सुमन बांगर, विशाल हिंगणे, विश्वास पडवळ, सुशील घराडे, देविदास लोखरे, ब्रिजेश मिश्रा आणि सुमन खंदारे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद-
याच निमित्ताने स्वप्नपूर्ती सांस्कृतिक मंडळ, शिरढोण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिरही मोठ्या उत्साहात पार पडले. “सन आय व्हिजन” यांच्या सहकार्याने तसेच ISHA NETRALAYA यांच्या सर्जिकल सपोर्टमुळे नागरिकांना विविध नेत्रसेवा देण्यात आल्या.
अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध-
या शिबिरात डिजिटल चष्म्यांचे नंबर तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्स तपासणी, मोतीबिंदू निदान, रेटिना तपासणी तसेच लेसर उपचार अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय काचबिंदू व डोळ्यांचे इतर आजार तसेच लहान मुलांच्या डोळ्यांचे विकार यांचे निदान व उपचार करण्यात आले. काही रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा यशस्वी संगम-
एकूणच, सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जपणूक आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणारा हा संयुक्त जयंती उत्सव आणि नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.

जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुदाम वराट सर यांची निवड: श्री साकेश्वर विद्यालयामध्ये केला शिक्षक व ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान https://lokbhavanmarathinews.com/1329/jamkhed-takuka/
https://student.maharashtra.gov.in

