Mumbai MHADA Lottery 2026: 2640 घरांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि अंतिम तारखाMumbai MHADA Lottery 2026: 2640 घरांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि अंतिम तारखा

Mumbai MHADA Lottery 2026: 2640 घरांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि अंतिम तारखा

मुंबई | प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 118 सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी गेल्या महिन्यात उपलब्ध करून दिली होती. यानंतर आता मुंबई महामंडळातर्फे मुंबईच्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून या सोडतीची जाहिरात 30 मार्च 2026 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . महत्त्वाचे म्हणजे सदनिका सोडत प्रक्रियेबाबत माहिती देणारी पुस्तिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते आणि ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे 30 मार्च रोजी विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात करण्यात आली आहे . ही घरे मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील आहेत.


📍 Mumbai MHADA Lottery 2026: कोणत्या भागात उपलब्ध आहेत घरे?

या सोडतीत मुंबईतील अनेक प्रमुख भागांमध्ये घरे उपलब्ध आहेत:

  • कन्नमवार नगर – विक्रोळी
  • पत्राचाळ सिद्धार्थ नगर – गोरेगाव
  • जुने मागाठाणे – बोरीवली
  • गोराई – बोरीवली
  • सुभाष नगर – चेंबूर
  • गांधीनगर – वांद्रे
  • पंतनगर – घाटकोपर
  • गिरगाव, वडाळा, माझगाव
  • कोपरी – पवई, तुंगा – पवई
  • लोकमान्य नगर – दादर
  • पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल – वडाळा

📅 Mumbai MHADA Lottery 2026 :महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू: 30 मार्च 2026 (दुपारी 3 वाजता)
  • अर्जाची अंतिम तारीख: 29 एप्रिल 2026 (रात्री 11:59)
  • अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2026
  • प्रारूप यादी प्रसिद्ध: 5 मे 2026
  • हरकती/दावे नोंदविण्याची मुदत: 8 मे 2026
  • अंतिम यादी: 12 मे 2026
  • सोडत दिनांक: 15 मे 2026 (सकाळी 11 वाजता)

🏠 Mumbai MHADA Lottery 2026: उत्पन्न गटानुसार घरांचे वाटप

  • अत्यल्प उत्पन्न गट (EWS): 145 घरे
  • अल्प उत्पन्न गट (LIG): 858 घरे
  • मध्यम उत्पन्न गट (MIG): 1408 घरे
  • उच्च उत्पन्न गट (HIG): 229 घरे

💻 Mumbai MHADA Lottery 2026: अर्ज कसा कराल?

इच्छुक अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि पुस्तिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


📌 महत्त्वाची माहिती

  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे
  • RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरता येणार
  • सोडतीचे ठिकाण नंतर जाहीर होणार
  • सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार

https://lokbhavanmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!