जामखेड येथे संविधान महोत्सव २०२६ मध्ये सुदाम वराट सर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करतानाजामखेड येथे संविधान महोत्सव २०२६ मध्ये सुदाम वराट सर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करताना

सुदाम वराट सर यांना संविधान महोत्सव–२०२६ पुरस्कार पत्रकारितेतल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. जामखेड शहरात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी “संविधान महोत्सव–२०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले होते.
“उत्सव देशाचा… जल्लोष संविधानाचा… वारसा आंबेडकरी चळवळीचा…” या प्रेरणादायी घोषवाक्यासह हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा या महोत्सवाचे १३ वे वर्ष होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

सुदाम वराट सर यांना संविधान महोत्सव–२०२६ पुरस्कार वितरण कार्यक्रम

या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत शिक्षक व पत्रकार, साकतचे भूमिपुत्र आदरणीय श्री. सुदाम वराट सर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘संविधान महोत्सव–२०२६ आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

साकत येथील श्री. साकेश्वर विद्यालयात कार्यरत असलेले श्री. सुदाम वराट सर हे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावत आहेत. शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या तसेच शिक्षण विषयक घडामोडी प्रभावीपणे मांडत त्यांनी सामाजिक भान जपले आहे.

गेल्या सतरा वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, पाच वर्षे ‘सकाळ’ दैनिकात त्यांनी काम केले आहे. सध्या मागील बारा वर्षांपासून ते ‘सामना’चे जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून ‘जामखेड न्यूज’चे संपादक म्हणून ते जबाबदारीने काम पाहत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी श्री. सुदाम वराट सर यांचे अभिनंदन केले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

यांना पुररस्काराचे वितरण करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव तसेच जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुदाम वराट सर संविधान महोत्सव–२०२६ पुरस्काराने पत्रकारितेत त्यांच्या योगदानासाठी गौरवले गेले. या पुरस्कारानिमित्त जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात अधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!