राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर:ग्रामीण भागात निवडणुकांची उत्सुकताराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर:ग्रामीण भागात निवडणुकांची उत्सुकता

राज्य निवडणूक आयोगाने बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून ते जुलै २०२६ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Ads

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ८ जून २०२६ पर्यंत आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येणार आहे. त्यानंतर १२ जून २०२६ पर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

१७ जून २०२६ पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १९ जून ते २५ जून २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून उपविभागीय अधिकारी ३ जुलै २०२६ पर्यंत अभिप्राय सादर करणार आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन ८ जुलै २०२६ पर्यंत अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. तसेच १० जुलै २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण यादीला व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा कार्यक्रम जाहीर केला असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच “ग्रामपंचायत (बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात असलेल्या) सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे) आदेश, २०२६” या सुधारित आदेशाचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागात उत्सुकता निर्माण झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.

प्रभागाच्या आरक्षणाचे वेळापत्रक असे…

सोडतीसाठी ग्रामसभेची अधिसूचना : ८ जून

सोडतीसाठी ग्रामसभा : १२ जून

प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण प्रसिद्धी : १९ जून

प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना : १९ ते २५ जून

हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय : ३ जुलै

अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी : १० जुलै

https://lokbhavanmarathinews.com

https://chat.whatsapp.com/IzwBnqzWnkR7kRoot9djA9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!