Sakat-साकत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर; आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – ह.भ.प. उत्तम महाराज वराट
साकत (प्रतिनिधी) सुनिल पुलवळे
मोफत नेत्र तपासणी साकत शिबिराचे आयोजन
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न प्रतिष्ठान, पाटोदा आणि पुण्यातील प्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री .अमोल विठ्ठल पुलवळे यांच्या पुढाकाराने साकत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९ते दुपारी ०२ वाजेपर्यंत साकत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते.

मोफत नेत्र तपासणी साकत – उद्घाटन व प्रमुख अभिभाषण
या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी बोलताना उत्तम महाराज वराट म्हणाले की, अशा प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम गावासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही मोठी सेवा असून “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे” असे त्यांनी नमूद केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आयोजक श्री. अमोल विठ्ठल पुलवळे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

मोफत नेत्र तपासणी साकत – मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास साकत गावच्या सरपंच मनीषाताई मुरूमकर, माजी पंचायत समिती सभापती संजय वराट, माजी पंचायत समिती सभापती भगवान मुरूमकर, उपसरपंच राजाभाऊ वराट, ऋषिकेश मुरूमकर, गावचे पोलीस पाटील महादेव वराट, विठ्ठल वराट (ग्रामपंचायत सदस्य, साकत), माजी सरपंच हरिदास मुरूमकर, वनमित्र रामभाऊ मुरूमकर,गणेश वराट,गणेश कडभने ,रामहरी वराट,सुनिल पुलवळे,विकास मिसाळ, बापूसाहेब घोडेस्वार, जयेश मिलिंद घोडेस्वार, नामदेव पुलवळे, विलास पुलवळे,प्रशांत पुलवळे,महादेव जाणू पुलवळे,भिमराव घोडेस्वार आदी मान्यवर तसेच साकत ,कढभनवाडी ,कोल्हेवाडी ,पिंपळवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोफत नेत्र तपासणी साकत – विशेष सहकार्य
या शिबिरासाठी पुण्यातील प्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल चे डॉ. विशाल भिंगारदिवे, डॉ. विकास वाळुंज तसेच साहित्यरत्न प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिरातील तपासणी व उपचार
या शिबिरामध्ये एकूण १७५ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८ रुग्णांना मोफत चष्मे प्रदान करण्यात आले, तर २३ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. ही शस्त्रक्रिया पुढील टप्प्यात पुणे येथे करण्यात येणार आहे.
अनुभवी व तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक नागरिक आर्थिक अडचणींमुळे वेळेवर तपासणी करून घेत नाहीत, ज्यामुळे मोतीबिंदू, नंबरचा त्रास तसेच इतर डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण वाढते. अशा रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ग्रामीण आरोग्य जागरूकता व शिबिराचे महत्त्व
साहित्यरत्न प्रतिष्ठान आणि बुधराणी हॉस्पिटल यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारची शिबिरे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

हि बातमीही वाचा Auto Rickshaw And Taxi Permit : आजपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांना स्थगिती; सरकारचा मोठा निर्णय https://lokbhavanmarathinews.com/1078/new-auto-rickshaw-and-taxi-permit/


