गणेश सकपाळ नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य समिती उपसभापतीनवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या उपसभापतीपदी नगरसेवक गणेश सकपाळ यांची निवड

नवी मुंबई (प्रतिनिधी):
नवी मुंबई महानगरपालिकाच्या आरोग्य समितीच्या उपसभापतीपदी नगरसेवक गणेश सकपाळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नवी मुंबई शहरातील आरोग्य सेवा आणि स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे या दृष्टीने आरोग्य समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

यावेळी पिठासन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन निवड झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच आरोग्य समितीच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना गणेश सकपाळ म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते सागर नाईक साहेब यांच्या माध्यमातून माझी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. ही जबाबदारी म्हणजे माझ्यावर ठेवलेला विश्वास असून तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.

पुढे बोलताना गणेश सकपाळ यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवण्यासाठी, स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन.

नवी मुंबई शहर हे वेगाने विकसित होत असलेले शहर आहे. त्यामुळे येथे उत्तम आरोग्य सुविधा आणि स्वच्छता व्यवस्था उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील रुग्णालये, आरोग्य केंद्रे तसेच स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले

शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा व्हावी तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या निवडीसाठी नगरसेवक गणेश सकपाळ यांनी मा. गणेशजी नाईक साहेब, डॉ. संजीवजी नाईक साहेब, मा.संदीपजी नाईक साहेब, मा. सागरजी नाईक साहेब तसेच भारतीय जनता पक्ष, सर्व पदाधिकारी, सहकारी आणि नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले .

ही पण बातमी पहा

CIDCO Lottory 2026 Update: सिडकोच्या १६,८७६ घरांसाठी पर्याय निवडीची अंतिम मुदतवाढ १९ मार्च २०२६ पर्यंत https://lokbhavanmarathinews.com/951/cidco-lottory-2026-update/

https://cidcohomes.com/en

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!