CIDCO Lottory 2026 Update: सिडकोच्या १६,८७६ घरांसाठी पर्याय निवडीची अंतिम मुदतवाढ १९ मार्च २०२६ पर्यंतCIDCO Lottory 2026 Update: सिडकोच्या १६,८७६ घरांसाठी पर्याय निवडीची अंतिम मुदतवाढ १९ मार्च २०२६ पर्यंत

सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या 16,876 सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 19 मार्च पर्यंत तुम्ही तुमच्या हक्काचं घर निवडू शकता.

“माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी 16,876 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नागरिकांना सोयीस्कर व सक्षम शहरी जीवनशैलीची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेत अनामत रक्कमेचा भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख 15 मार्च 2026 तर आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख 19 मार्च 2026 आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत व अद्ययावत माहिती सिडकोतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकांद्वारे तसेच सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वेळोवेळी प्रसारित केली जाते.

त्यामुळे नागरिकांनी योजनेविषयी इतरत्र उपलब्ध होणाऱ्या अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिडकोने केले आहे. अधिकाधिक नागरिकांनी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन योजनेसाठी अर्ज करावा असे सिडकोने सांगितले आहे. नवी मुंबईतील आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे, असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे. ही सर्व घरं मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेकांनी या घरांसाठी अर्ज केले आहे. ते पाहात ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी मुंबई : स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खारघर पूर्व (East) तळोजा सेक्टर २८ येथे २२.६० लाख रुपयांपासून घर खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. परवडणाऱ्या किमतीत आधुनिक सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे ही योजना घरखरेदीदारांसाठी आकर्षण ठरत आहे.

ही घरे City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd (सिडको) अंतर्गत विकसित करण्यात आली असून प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचाही लाभ मिळू शकतो.

चर्चेतली बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!