अजित पवार विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करत बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवारबारामती पोलिसांचा FIR ला नकार

मुंबई –  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चौकशी होण्यासाठी बारामती पोलीसांकडून गुन्हा दाखल केला जावा यासाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आमदार रोहित पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन तास त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला, मात्र मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याप्रमाणेच बारामतीमध्ये त्यांना अनुभव आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिला. यावरुन पोलीस अधिकारी आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली. यानंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआरला वाचवण्यात बड्या व्यक्तीचा हात असल्याचा आरोप केला.

रोहित पवार आणि त्यांच्या वकिलांच्या पथकाने सुमारे दोन तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यांनी VSR विमान कंपनी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाविरोधात (DGCA) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांचे युक्तिवाद फेटाळून लावत एफआयआर घेण्यास नकार दिला. यावेळी पोलीस अधिकारी आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “आम्ही कोणाचाही राजीनामा मागत नाही. आमची एकच मागणी आहे — अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे.”

अपघातानंतर तब्बल २७ दिवसांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) VSRच्या लेअरजेट प्रकारातील पाच विमानांवर उड्डाणबंदी घातली. मात्र संबंधित कंपनीवर थेट कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. जर विमानांमध्ये तांत्रिक दोष होते, तर ते विमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना का देण्यात आले, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

त्यांच्या मते, ही केवळ तांत्रिक चूक नसून यामागे मोठे राजकीय संरक्षण असू शकते. त्यामुळेच कंपनीवर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआर कंपनीच्या संचालकांचे अनेक सत्तेतील अेक बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईची टाळाटाळ होत आहे. कंपनीचे संचालक रोहित सिंग यांच्या लग्नाला महाराष्ट्रातून फार मोठा नेता हजर होता. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देखील तिथे उपस्थित होते. चंद्राबाबू नायडू यांच्या मालकीच्या कंपनीने व्हीएसआरला निधी दिला आहे, मध्यप्रदेशातील एका बड्या नेत्यानेही निधी दिला आहे, महाराष्ट्रातीलही अनेक बडे नेते व्हीएसआरशी संलग्न असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. व्हीएसआरचे सत्तेतील अशा लोकांशी संबंध आहेत, त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांचा एफआयआर बारामती पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आला नाही. रोहित पवारांची मागणी होती की, व्हीएसआर विमान कंपनी आणि त्यांना वाचवणाऱ्या डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. ते म्हणाले की, डीजीसीएकडून काही लोकांना वाचवले जात आहे. अजित दादांच्या अपघाताबद्दल आम्हाला शंका आहे, व्हीएसआरची विमाने खराब होती तर अजित दादांना ते विमान का दिले गेले, असा सवाल त्यांनी केला.

बारामती पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, कॉज ऑफ अॅक्शन देत डीजीसीएने व्हीएसआरच्या विमानांची उड्डाणे थांबवली आहेत, जर त्यांची विमाने उड्डाणा योग्य नव्हती तर मग त्यातील विमान अजित पवारांना का दिले गेले, असा सवाल उपस्थित करुन आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो, मात्र एफआयआर दाखल करुन घेतला जात नाही. रोहित पवार हे आज (गुरुवार) दुपारी 3 वाजता सीआयडी ऑफिसला जाणार आहोत. ते म्हणाले की, त्यांचा काय तपास सुरु आहे, ते आम्ही समजून घेऊ.

चर्चेतल्या बातम्या

Rohit Pawar : अजित दादांच्या आठवणीत पुतण्या हळहळला, शोक प्रस्ताव मांडताना रोहित पवारांना अश्रू अनावर https://lokbhavanmarathinews.com/874/rohit-pawar-ashru-anavar-ajit-pawar-shok-prastav-vidhansabha/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!