छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 जाहिरातछत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026: विविध पदांच्या 222 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 222 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर पात्रता, अटी व शर्ती जाणून घेऊन निर्धारित मुदतीत अर्ज करावा.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 उपलब्ध पदे (एकूण 222 जागा)

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • उपअग्निशमन केंद्र अधिकारी
  • सहाय्यक सुरक्षा अधिकारी
  • स्थापत्य अभियंत्रिका सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक
  • स्वच्छता निरीक्षक
  • पशुधन पर्यवेक्षक
  • चालक-यंत्रचालक
  • उद्यान सहाय्यक / कृषि सहाय्यक
  • अनुरेखक (ट्रेसर)
  • अग्निशामक
  • रोखपाल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
👉 सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय:
    • सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्षे
    • मागासवर्गीय / अनाथ / EWS – 43 वर्षे
    • अपंग / भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त / स्वातंत्र्यसैनिकांची मुले – 45 वर्षे
    • अंशकालीन (अर्धवेळ) कर्मचारी – 55 वर्षे

अर्ज शुल्क

  • सर्वसाधारण प्रवर्ग – ₹1,000/-
  • मागासवर्गीय / अनाथ प्रवर्ग – ₹900/-
  • माजी सैनिक व अपंग माजी सैनिक – शुल्क माफ

अर्ज करण्याची अंतिम तारीख

🗓️ 18 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 महत्त्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ अधिकृत जाहिरात डाउनलोड करून सविस्तर माहिती वाचणे आवश्यक आहे.

https://lokbhavanmarathinews.com/wp-content/uploads/2026/02/Sambhaji-Nagar-Mahanagarpalika-Recruitment-2026.pdf

https://www.chhsambhajinagarmc.org

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!