कार्यक्रमाचे उदघाटन करताना गावच्या प्रथम नागरिक सौ. मनीषा सर्जेराव पाटील (सरपंच, साकत) आणि मान्यवरकडभनवाडी येथे भव्य हळदी-कुंकू मेळावा; लकी ड्रॉ व संगीत खुर्ची स्पर्धांनी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कडभनवाडी (साकत) येथे भव्य हळदी-कुंकू मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.कडभनवाडी हळदी कुंकू मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कडभनवाडी (साकत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य हळदी-कुंकू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हळदी-कुंकू व वाण वाटप, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच भव्य लकी ड्रॉ स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महिलांसह ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक सौ. मनीषा सर्जेराव पाटील (सरपंच, साकत) यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. राजाभाऊ वराट (उपसरपंच, साकत) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. महादेव आसराजी वराट (पोलीस पाटील, साकत), सौ. उर्मिलाताई भगवान मुरूमकर, श्री. नागराज रामभाऊ मुरूमकर, युवा नेते श्री. प्रतीक कैलास मुरूमकर, तरुण तडफदार श्री. प्रतीक भगवान मुरूमकर तसेच शिक्षण विभागाकडून श्री. विक्रम बडे साहेब (केंद्रप्रमुख, साकत), सौ. दिपाली नागरगोजे मॅडम (विशेष शिक्षिका) , सौ. पोफळे (तालुका समन्वयक, मूल्यवर्धन) ,शरद मिसाळ, ईश्वर नेमाने, बाबासाहेब कडभने (पोलीस कॉन्स्टेबल, जामखेड), गणेश कडभने (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, माता-भगिनी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा पोषण आहार मदतनीस व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कडभनवाडी (साकत) येथे भव्य हळदी-कुंकू मेळावा या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे आहेत

संगीत खुर्ची स्पर्धेचे विजेते

भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते

प्रथम बक्षीस श्री. राजाभाऊ वराट (उपसरपंच, साकत), द्वितीय बक्षीस श्री. गणेश श्रीराम कडभने (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ) तर तृतीय बक्षीस श्री. सुशेन कांतीलाल कडभने (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) यांनी दिले . संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस श्री. विजय जेधे सर, द्वितीय बक्षीस श्री. शिवाजी मिसाळ सर तर तृतीय बक्षीस सौ. संगीता देवीदास कडभने (अंगणवाडी सेविका) यांनी दिले .

निकोप व आनंदी वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी श्री. व सौ. जेधे यांना लग्नवाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. जेधे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी मिसाळ सर यांनी केले.

कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था श्री. सचिन नेमाने (ग्रामपंचायत सदस्य) व युवा नेते श्री. ईश्वर उद्धव नेमाने यांनी केली. स्वयंपाकाची जबाबदारी श्री. तांबे यांनी समर्थपणे पार पाडली.

कडभनवाडी (साकत) येथे भव्य हळदी-कुंकू मेळावाहळदीकुंकू मेळावा हा महाराष्ट्रातील महिलांचा पारंपरिक आणि सामाजिक एकोपा जपणारा उपक्रम आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी हा मेळावा उत्साहात आयोजित केला जातो. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू, वाण व शुभेच्छा देत सौख्य, समृद्धी आणि आरोग्याची कामना केली. कार्यक्रमादरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. अशा उपक्रमांमुळे महिलांमधील आपुलकी, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कडभनवाडी (साकत) येथे भव्य हळदी-कुंकू मेळावामकरसंक्रांत हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरा होणारा महत्त्वाचा पारंपरिक व सांस्कृतिक सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होत असल्याने मकरसंक्रांत हा नवीन ऊर्जा, आशा, सकारात्मकता आणि शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि निसर्गातही नवचैतन्य दिसून येते.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी तिळगुळ वाटप केले जाते. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून मतभेद विसरून आपुलकी, प्रेम आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला जातो. याचबरोबर पतंग उडवण्याचा आनंद, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, तसेच भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कडभनवाडी (साकत) येथे भव्य हळदी-कुंकू मेळावामकरसंक्रांतीच्या सणामुळे पारंपरिक संस्कृती जपली जाते आणि समाजातील सर्व घटक एकत्र येतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या सणात सहभागी होत असल्याने सामाजिक एकोपा अधिक मजबूत होतो. अशा सण-उत्सवांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!