साहित्यरत्न प्रतिष्ठानकडून सत्कारपिंपरी-चिंचवडमध्ये गौरव सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

विधान परिषद आमदार सन्माननीय श्री अमित दादा गोरखे साहेब यांच्या मातोश्री अनुराधाताई गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा साहित्यरत्न प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास साहित्यरत्न प्रतिष्ठानचे मुख्य सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल पुलवळे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोथरूड (पुणे) चे अध्यक्ष श्री योगेश आडागळे, सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश चव्हाण, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी उपाध्यक्ष श्री गणेश चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गंगाधर मद्रासी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनुराधाताई गोरखे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या अनुराधाताईंचे नेतृत्व पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

अमित दादा गोरखे यांचे कार्य

विधान परिषद आमदार सन्माननीय श्री अमित दादा गोरखे साहेब यांचे कार्य

विधान परिषद आमदार सन्माननीय श्री अमित दादा गोरखे साहेब हे युवकांचे प्रेरणास्थान असून सामाजिक न्याय, शिक्षण, युवक सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत विविध उपक्रम राबवण्यावर त्यांनी भर दिला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, वसतिगृह सुविधा आणि शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण योजनांसाठी त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी विधिमंडळात अनेकदा आवाज उठवला आहे.

युवकांना उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगाराकडे वळवण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सामाजिक सलोखा, समता आणि संविधानिक मूल्ये जपण्यावर त्यांचा विशेष भर असून सर्वसमावेशक विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!