श्री साकेश्वर हॉस्पिटल साकत उद्घाटन सोहळासाकत येथे श्री साकेश्वर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा

श्री साकेश्वर हॉस्पिटल साकत – आधुनिक आरोग्य सुविधांचा नवा केंद्रबिंदू

श्री साकेश्वर हॉस्पिटल साकत येथे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या हॉस्पिटलमुळे साकत आणि परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. साकत गावामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री साकेश्वर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी दि. १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मा.प्राचार्य श्रीराम सदाशिव मुरूमकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णसेवेचा संकल्प आणि सामाजिक बांधिलकी यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.श्री साकेश्वर हॉस्पिटल साकत ग्रामीण आरोग्य सेवेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

श्री साकेश्वर हॉस्पिटल साकत उद्घाटन सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये

श्री साकेश्वर हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांसह २४x७ आरोग्यसेवा, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, प्राथमिक उपचार व विविध तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रुग्णसेवेला प्राधान्य देत ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा देणे हा या रुग्णालयाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ .स्नेहल प्रतिक मुरूमकर यांनी सांगितले .

या हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन, स्त्रीरोग उपचार, बालरोग उपचार, तसेच सांधेदुखी व गुडघेदुखीवरील उपचार उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अत्याधुनिक केअर सुविधांतर्गत इंजेक्शन व सलाईन सुविधा, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी तपासणी, ब्लड शुगर तपासणी, नेब्युलायझेशन (वाफ देणे), स्त्रीरोग तपासणी तसेच रक्त व लघवी तपासणी या सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.

साकतसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जामखेड येथे घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. या हॉस्पिटलचा लाभ कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कढभनवाडी तसेच परिसरातील नागरिकांना विशेषतः होणार असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन मा.प्राचार्य श्रीराम सदाशिव मुरूमकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ह. भ. प. उत्तम महाराज वराट, मा. सभापती भगवान दादा मुरुमकर, दत्तात्रय मुरुमकर सर , अरुण भाऊ वराट, माजी उपसभापती मार्केट कमिटी कैलास वराट सर,कांतीलाल वराट,उपसरपंच राजू वराट, गणेश शेठ वराट, विठ्ठल वराट, ऋषिकेश पाटील, सुरेश भाऊ वराट, हनुमंतनाना वराट, पोलीस पाटील महादेव वराट, ईश्वर मुरूमकर, भरत लहाने सर, रमेश आडसुळ सर, हरिभाऊ मुरूमकर,संपत मुरूमकर, गणेश मुरूमकर,रामभाऊ मुरुमकर, दिनकर मुरूमकर,मिलन घोडेस्वार, वैभव मुरूमकर, दिलीप मुरूमकर, भाऊसाहेब मुरुमकर,महारुद्र नेमाने, दिलीप घोलप, भीमा टेकाळे, साहेबरावनाना कडभने, रामहरी नेमाने, संजय बापू मुरूमकर, शिवाजी घोडेस्वार, विनोद मुरुमकर, दत्ता मुरुमकर, कल्याण मुरुमकर, भागवत मुरूमकर,अरुण सर, घोलप सर, विजय घोडेस्वार, रमेश मुरूमकर सर, शिवप्रसाद पाटील, बाळू गवळी, पत्रकार बापू घोडेस्वार, महादेव वराट, मदन लहाने, शहादेव कोल्हे, नाना गवळी,जयराम कोल्हे, डॉक्टर सतीश घोलप, राहुल वराट, अमोल वराट सावकार, नागराज मुरुमकर, पियुष मुरुमकर,ऋषीकेश लहाने, शंकर मुरुमकर,संदिप मुरुमकर व समस्त साकत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री साकेश्वर हॉस्पिटलमुळे साकत व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

सध्या सकाळी ते दुपारपर्यंत डॉक्टर उपलब्ध असल्याने रात्रीच्या वेळेस डॉक्टर सेवा नसल्यामुळे गाव व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अचानक आजारपण, पोटदुखी, ताप, अपघात किंवा महिलांची आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास रुग्णांना जामखेड किंवा इतर ठिकाणी जावे लागत असल्याने सर्वसामान्यांची मोठी हालअपेष्टा होत होती.

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वाहनांची सुविधा मर्यादित असल्याने रुग्णांना दूरच्या रुग्णालयात नेण्यासाठी वेळ, खर्च आणि जीविताचा धोका वाढत होता. विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत होती. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला तसेच गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेळेवर उपचार न मिळाल्यास गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.

मात्र आता श्री साकेश्वर हॉस्पिटलमुळे ही समस्या सुटणार आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन येथे २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे गाव व पंचक्रोशीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रात्रीच्या वेळेसही डॉक्टर उपलब्ध राहणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार मिळणे शक्य होणार आहे.

२४ तास सेवा सुरू झाल्यामुळे जामखेड किंवा इतर ठिकाणी धाव घ्यावी लागण्याची गरज कमी होणार असून, वेळेवर उपचार मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. श्री साकेश्वर हॉस्पिटलच्या या निर्णयामुळे ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!