UPSC परीक्षेत यश मिळवून IPS अधिकारी झालेल्या निखिल तांबे यांचा अरणगावमध्ये भव्य सत्कार
📍 अरणगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) – प्रतिनिधी
अरणगाव (ता. जामखेड) येथील श्री अरण्येश्वर मंदिर परिसरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून निवड झालेल्या निखिल काशिबा तांबे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा. सभापती राम शिंदे यांनी निखिल तांबे यांचे अभिनंदन करत त्यांचे यश ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, ग्रामीण व कष्टकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश संपादन करणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. निखिल तांबे यांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ अरणगावचेच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत यश
अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून शिक्षण घेत सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर निखिल तांबे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS पद मिळवले आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबियांचे संस्कार, त्याग आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचेही राम शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून शिक्षण आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर देशातील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतात, याचे निखिल तांबे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
या नागरी सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ह. भ. प. कोळेकर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर आबा राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सरकारी अभियोक्ता बीड बाळासाहेब कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे सभापती शरद कार्ले, गटनेते तात्या पोकळे, युवानेते सागर धस, वनक्षेत्रपाल (RFO) वन विभाग कर्जत मोहन शेळके, पोलीस निरीक्षक घनश्याम तांबे, नगरसेवक विकी घायतडक, नगरसेवक अॅड. प्रविण सानप, नायब तहसीलदार महादेव कारंडे, नगरसेवक प्रविण होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव कुराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. सिताराम ससाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय अमित चिंतामणी, लहू शिंदे, भाऊसाहेब वाघमोडे (निखिल तांबे यांचे काका), काशिबा बलभिम तांबे (वडील), संगीताताई काशिबा तांबे (आई), सविता भाऊसाहेब वाघमोडे (मावशी) तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा
या कार्यक्रमाच्या माध्यमातून निखिल तांबे यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रशासन सेवेकडे वळून समाजासाठी कार्य करावे, असा प्रेरणादायी संदेशही देण्यात आला.
अरणगावच्या सुपुत्राने मिळवलेले हे यश संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आदर्श शिक्षक अशोक नाईकवाडे यांची परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदाला गवसणी ; राज्यात 37 वा तर बीड जिल्ह्यात 3 रा क्रमांक https://lokbhavanmarathinews.com/1117/ashok-naikwade-kendrap
